21 सप्टेंबरपासून शाळा सुरू:9वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत जाऊ शकतील; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.८: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी 9वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षणाला सुरू करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) जाहीर केली आहे. यानुसार येत्या 21 सप्टेंबरपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होतील. मंत्रालयाने म्हटले की, शाळा आणि कॉलेज शिक्षण सुरू करण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतील. परंतू, क्लासेस वेगवेगळ्या टाइम स्लॉटमध्ये भरवले जातील आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत येऊ दिले जाणार नाही.

या नियमांचे पालन सर्वांना करावे लागेल

शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल. तसेच, सतत हात धुणे, मास्क लावणे आणि सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागेल.

या आहेत गाइडलाइन्स

शाळेत क्लासेस सुरू होण्यासोबतच ऑनलाइन आणि डिस्टेंस लर्निंगदेखील सुरू ठेवावी लागेल.

शाळेत 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या इच्छेने शाळेत येण्याची परवानगी आहे.

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची लिखीत परवानगी घ्यावी लागेल.

फक्त कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील शाळा सुरू होतील.

शाळा सुरू होण्यापूर्वी दररोज सर्व परिसर सॅनिटाइज करावा लागेल.

50% टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफला ऑनलाइन टीचिंग आणि टेली काउंसिंलिंगसाठी शाळेत बोलवले जाईल.

विद्यार्थ्यांसाठी बायोमीट्रिक अटेंडेंसऐवजी कॉन्टॅक्टलेस अटेंडेंसची व्यवस्था करावी लागेल.

विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सहा फुटांचे अंतर असणे अनिवार्य आहे.

सभा, स्पोर्ट्स अॅक्टिविटी आणि इतर इव्हेंट होणार नाहीत.

जिमचा वापर केला जाऊ शकेल, परंतू स्वीमिंग पूल बंद राहतील.

शिक्षक, कर्मचाऱ्यांना फेस मास्क, हँड सॅनिटाइजर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!