शाळांच्या संचमान्यतेबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; शिक्षकांचे भवितव्य ठरणाऱ्या प्रक्रियेला गती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

३० सप्टेंबरपर्यंत आधार वैध असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरच सन २०२६-२७ ची ऑनलाइन संचमान्यता होणार असल्याने शाळांना आधार नोंदणी अद्यावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २७ सप्टेंबर : राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन संचमान्यता करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरअखेर स्टुडंट पोर्टलवर ‘आधार व्हॅलिड’ (आधार प्रमाणित) झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष पटसंख्येच्या आधारावरच ही संचमान्यता केली जाणार आहे. शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शाळा प्रशासनाला याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

आधार प्रमाणीकरणाची अट सक्तीची

शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी संचमान्यता हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. यु-डायस प्लस आणि सरल पोर्टलवरील विद्यार्थी डेटा, शाळा व्यवस्थापन माहिती आणि आधार व्हॅलिडेशन एकसमान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांची आधार माहिती जुळत नाही किंवा आधार कार्ड अपडेट झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांची माहिती १६ सप्टेंबरपूर्वीच अद्यावत करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता ३० सप्टेंबरची अंतिम मुदत धरून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

शिक्षक पदांच्या मान्यतेवर होणार थेट परिणाम

आधार वैध नसलेले किंवा अपूर्ण माहिती असलेले विद्यार्थी संचमान्यतेच्या गणतीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी दाखवली जाऊन शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याचा किंवा रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलवरील सर्व त्रुटी तातडीने दूर करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!