दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । सातारा । माहे जानेवारी 2021 – मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व माहे जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह (सदस्य पदासह थेट सरपंच) संगणकप्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने खालीलप्रमाणे घोषित केलेला आहे.
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 13 सप्टेंबर 2022, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2022 (दिनांक 24 सप्टेंबर चा शनिवार व 25 सप्टेंबर 2022 चा रविवार वगळून) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वा. नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दि. 13 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 वा. पर्यंत. मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) दि. 14 ऑक्टोंबर 2022 तर निवडणूकांच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 19 ऑक्टोंबर 2022 असा राहील.