फलटण तालुक्यात टंचाईसदृश परिस्थिती; आ. दिपक चव्हाण यांचे टंचाई निवारण आराखडा तयार करण्याचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
पावसाने ओढ दिल्याने विशेषतः फलटण तालुक्याला पाणी पुरवठा करणार्‍या वीर, भाटघर, नीरा – देवघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पुरेसा पाऊस नसल्याने फलटण तालुक्यात टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत टंचाई आढावा घेण्यात आला. यावेळी आ. दिपक चव्हाण यांनी संभाव्य टंचाई निवारण आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

आढावा बैठकीस सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, निवासी नायब तहसीलदार डॉ. सौ. डी. एस. बोबडे – सावंत, संजय गांधी योजना नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरवदे, निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान उपस्थित होत्या.

सरासरीच्या ६० % पाऊस धरणेही भरली नाहीत

फलटण तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ४५९.९ मि.मी. इतकी असून आज अखेर १९२.८ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ६०.५ % पाऊस झाला आहे. फलटण तालुक्याला शेती व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या भाटघर, नीरा – देवघर, वीर, गुंजवणी आणि धोम – बलकवडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधान कारक पाऊस नसल्याने ही धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरली नाहीत, तर पाऊस कमी झाल्याने आता धरणे भरणार की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.

आज सकाळी घेतलेल्या माहितीनुसार २३ टीएमसी क्षमतेचे भाटघर धरणात २०.५६ टीएमसी म्हणजे ८७.९३ % पाणी साठा आहे. आज सकाळ पर्यंतच्या २४ तासात १ मि. मी. आणि आज अखेर एकूण ४५१ मि.मी. पाऊस झाला आहे. १० टीएमसी क्षमतेचे वीर धरणात ७.३० टीएमसी म्हणजे ७७.६९ % पाणी साठा आहे. आज सकाळ पर्यंतच्या २४ तासात ० मि. मी. आणि आज अखेर एकूण ११० मि.मी. पाऊस झाला आहे. १३ टीएमसी क्षमतेचे नीरा – देवघर धरणात ११.६३ टीएमसी म्हणजे ९९.१४ % पाणी साठा आहे. आज सकाळ पर्यंतच्या २४ तासात ४ मि. मी. आणि आज अखेर एकूण १५७१ मि.मी. पाऊस झाला आहे. ३.५ टीएमसी क्षमतेचे गुंजवणी धरणात २.९९ टीएमसी म्हणजे ८१.२३ % पाणी साठा आहे. आज सकाळ पर्यंतच्या २४ तासात २ मि. मी. आणि आज अखेर एकूण ११०१ मि.मी. पाऊस झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!