स्थैर्य, खटाव, दि. 14 : जाशी, ता. माण येथे रविवारी सकाळी एक खवल्या जातीचे दुर्मीळ मांजर आढळून आले आहे. हे मांजर गेल्या दोन दिवसांपासून परिसरात दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
जाशी येथे गावाच्या पश्चिम बाजूला गोंदवले रोडलगत पवारवस्ती (वाणकी) येथे दुर्मीळ असे खवल्या मांजर आढळून आले असून हे मांजर गेल्या दोन दिवसांपासून परिसरात दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. खवले मांजर ज्या भागात आढळून आले आहे तो भाग डोंगराळ दगड तसेच परिसर मोठा आहे. या भागात नालाबांध व राणंद तलाव्यातून येणारा कॅनॉल आहे तसेच चांगली शेती आहे. वन्य प्राणी यांना योग्य वावर होण्यासाठी हा परिसर योग्य असल्यानेच हे मांजर आढळून आल्याचे बोलले जात आहे तसेच येथे इतर वन्य प्राण्यांचा वावर दिसून येत आहे. मांजर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी येथे गर्दी केली होती.