साताऱ्याच्या सायली त्रिंबके यांची घाटकोपरमध्ये आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । रेस्क्यू मॉम म्हणून परिचित असलेली साया अनिमाल केअरच्या संचालिका सायली त्रिंबके यांचे मुंबईत निधन झाले. आज (रविवार) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव गडकर आळी येथील निवासस्थानी आणले जाणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

भटक्या कत्र्यांसाठी सायली हिने आपल जीवन समर्पित केले होते. लाॅकडाउनच्या काळात त्यांनी अनेक भटक्या प्राण्यांची देखभाल केली. ज्या ज्या भागात आवश्यकता पडेल तेथे त्या जाऊन प्राण्यांना खाऊ घालत असतं. त्यांच्या कार्याची अनेक संस्था, संघटनांनी दखल घेऊन त्यांचा सन्मान देखील केला आहे.

सायली यांचा प्रतापगंज पेठ येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. एकदा त्या पार्लरमध्ये झाेपी गेल्या हाेत्या. त्यावेळी त्यांना रस्त्यावर काही हालचाली जाणवल्या. त्यांनी उठून पाहिल्यानंतर त्यांना चाेरीच्या हेतुने काेणी तरी आल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ परिचित लाेकांना फाेन करुन हा प्रकार सांगितला.

त्यानंतर त्यांनी शटर उघडून त्या लाेकांचा पाठलाग केला. या घटनेतून सायली त्रिंबके यांनी दुचाकी चाेरी करणारी टाेळी शाहूपूरी पाेलिसांना पकडून दिली. त्यानंतर पाेलिस दलाने सायली यांच्या धाडसाचे काैतुक करुन त्यांचा सन्मान केला हाेता. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजातच साता-यातील प्राणीमित्र संघटनांनी त्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.


Back to top button
Don`t copy text!