
दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये एका गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून झालेली मारहाण ही अमानवीय घटना आहे जर महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी सुरक्षित नसतील तर महाराष्ट्र सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बेटी बचाव बेटी पढाव महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉक्टर शुभा फरांदे पाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली.
साताऱ्यात मारहाण झालेल्या गर्भवती महिलेची फरांदे पाध्ये यांनी भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या घटनेविषयी चा संताप त्यांनी व्यक्त केला शुभा फरांदे पाध्ये पुढे म्हणाल्या सिंधू सानप या महिलेला माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्याची पत्नी प्रतिभा यांनी बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली . या घटनेची तातडीने दखल घेऊन मी स्वतः मुंबईवरून सातार्यात दाखल झाले . या प्रकरणात दोषी दाम्पत्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
सातारा जिल्ह्यामध्ये जर महिला अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढत असताना याविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे जर महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी सुरक्षित नसतील तर गृहमंत्रालय करतोय काय ? या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर कुठे आहेत ? त्यांचे साधे वक्तव्य सुद्धा या प्रकरणावर निघत नाही याचा अर्थ महाराष्ट्र शासनाची प्रशासनावर पकड नाही हे स्पष्ट होते.
विधिमंडळामध्ये शक्ती कायदा संमत करण्यात आला आहेत काही तांत्रिक सोपस्कार आणि राज्यपालांची परवानगी यानंतर तो कायदा अमलात आणला जाणार आहे त्या कायद्याच्या अंमलबजावणीची इच्छाशक्ती राज्य शासनाने ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शुभा पाध्ये फरांदे यांनी दिला.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मनीषा पांडे अश्विनी हुबळीकर शहराध्यक्ष विकास गोसावी जिल्हा सर जिल्हा सरचिटणीस मिलिंद विठ्ठल बल शेठ पवार ओबीसी युती जिल्हाध्यक्ष किरण पवार रीना भणगे जागृती ससाणे मनीषा जाधव या वेळी उपस्थित होते.