
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थैर्य, फलटण, दि. ०३ जानेवारी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह संत बापूदास नगर आणि हनुमान नगर येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक अशोकराव जाधव, दादा साप्ते, दीपक शिंदे, संदिप नेवसे, शरद दीक्षित, मुनिष जाधव, नंदूशेठ नाळे, आशिष भोसले, विवेक शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
संत बापूदास नगर आणि हनुमान नगर परिसरातील समाज बांधवांनी या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
