दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑकटोबर २०२२ । सातारा । केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या नावावर ० ते २० पटसंख्या असलेल्या शासकीय प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट महाराष्ट्र शासनाने घातला आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर शाळा वाचवा शिक्षण वाचवा कृती समितीच्या वतीने इशारा मोर्चा काढण्यात आला होता.
शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यात पोचवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तेथे घोषणा दिल्यानंतर मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावयाचे निवेदन जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांना शिष्ट मंडळाच्या वतीने देण्यात आले आणि त्यांना या प्रश्नावर विविध मुद्दे शिष्टमंडळाने सांगितले. निवेदनात म्हटले आहे की शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे आदिवासी दलित भटक्या विमुक्त गोरगरीब शेतकरी शेतमजूर कामगार वर्गातून येणाऱ्या मुला मुलींच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क हिरावून घेण्यासारखे आहे. शाळा बंद निर्णयामुळे बहुजन समाजाचे व विशेषतः मुलींचे आदिवासींचे शिक्षण धोक्यात आलेले आहे म्हणूनच शाळा बंद धोरण सरकारने रद्द करावे यासाठी आहे.
मोर्चामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष विजय मांडके, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, सातारचे अध्यक्ष गणेश दुबळे , परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती व मुस्लिम जागृती अभियान सातारचे समन्वयक मिनाज सय्यद , जयंत उथळे, प्रा गौतम काटकर , प्रा डॉ भारत जाधव प्रा. डॉ.दत्ताजीराव जाधव , सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सातारचे अध्यक्ष प्रा.बी.बी पाटील शिवाजी एकनाथ भोसले , राज्याध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश रोकडे, शैक्षणिक व्यासपीठ सातारचे सचिव भरत जगताप , नंदकुमार धनवडे, दिव्यांग प्रेरणा बहुउद्देशीय संस्था,अध्यक्ष नंदकुमार धनवडे, अनिता धनवडे सातारा, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय अपंग महासंघ महाराष्ट्र राज्य, राजेंद्र शिवाजी शिंगाडे, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रा. डॉ, दत्ताजीराव जाधव, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे शुभम ढाले, रोहित शिरसागर , अमित अनिता जनार्दन , प्रकाश काशीळकर , भरत लोकरे , प्रकाश फरांदे , चंद्रकांत जगताप आदी मोर्चात सहभागी झाले होते.
फोटोचा मजकुर – मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन देताना विजय मांडके , गणेश दुबळे , चंद्रकांत जगताप , सुरेश रोकडे , भरत लोकरे व इतर