दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । पुणे । नवगुडा ,आसिफाबाद येथील ग्रामस्थांचे लोकवर्गणीतून फुले चौकात सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 7 पुटी पूर्णाकृती ,सिमेंटच्या रंगीत पुतळ्याचे अनावरण सोहळा दि.20 मार्च 2022 रोजी सायं.5 वाजता फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व नवगुडा च्या सरपंच रेणुका मडावी यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास भव्य पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह्यूमन राइट्स चे अध्यक्ष ,माजी न्यायाधीश शिवदास महाजन, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे, नवगुडा चे पोलीस पाटील दत्तू व सौ.वसंता बेडारे ,उपसरपंच शंकर वडाई ,अखिल भारतीय माळी महासंघ तेलंगाणा राज्याचे अध्यक्ष प्रा.सुकुमार पेटकुले, उपाध्यक्ष नारायण गुरनुले,जिल्हाध्यक्ष शंकर नागोसे,मंडल अध्यक्ष बाबुराव वडाई,डिव्हिजन अध्यक्ष मेगाजी गुरनुले ,जेस्ट समाजसेवक पिटु दुर्गे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्व महापुरुषांना वंदन करून महात्मा फुले रचित सत्याचा अखंड सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी गायिले तर माळी विकास संस्था पुणे चे अध्यक्ष हनुमंत टिळेकर यांनी हे निर्मिका प्रार्थना म्हणून सर्वांनी स्त्री पुरुष समानता ,मानवता धर्म , माता पित्याची व दिन दुबल्यानची सेवा,सत्कार्य करण्याची बुद्धी ,महापुरुषांनचे आचार विचार आत्मसात करण्यास विनंती केली.
यानंतर गावगुडा परिसरात फुले दांपत्य फोटो फ्रेम पोलीस पाटील दत्तू व सौ.वसंता बेंडारे आणि सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी अर्ध पुतळे घेऊन महापुरुषांनचे नावानी जयघोष करीत रॅली काडून सभामंडपात आगमन केले.
यावेळी सत्यशोधक ढोक,सुकुमार पेटकुले,महाजन यांनी आधुनिक काळाची गरज व विज्ञान युग असल्याने आता अंधश्रद्धा कर्मकांड यामध्ये अडकू नये ,सत्य पडताळणी करण्यास शिका व आपले मुले उच्चशिक्षित कशी होतील हे पहावे असे मौलिक मार्गदर्शन करीत पुतळ्याचा परिसर सुंदर ठेवून बाजूला फळझाडे लावण्यासाठी व पावित्र्य राखण्याच्या सूचना केल्या .त्यानंतर मोठे वादळ येत नंतर मुसळधार पाऊस आल्याने कार्यक्रम उरक्ता घेतला. परंतु सर्वाना फहक्त याच गावात मुसळधार पाऊस झाल्याने म्हणजे निर्सगानें कृपादृष्टी केली म्हणून आनंद देखील झाला. सर्वांचे स्वागत प्रास्ताविक उपसरपंच शंकर वडाई तर आभार बाबुराव वडाई यांनी मानले.