श्रीमंत सत्यजीतराजेंचा विवाह सोहळा : कोरोनामुळे गर्दी टाळणार : श्रीमंत रामराजे


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । फलटण | माझे बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत मिथिलाराजे देसाई यांचा शुभविवाह गुरुवार, दि.२४ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. कोरोनाची परिस्थिती ओटोक्यात आली असली तरी कोरोनाच्या प्रार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतलेला आहे. नवदाम्पत्यांस आपल्या सर्व फलटणकरांचे शुभेच्छा व आशिर्वाद कायम असु द्यावेत, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

कोरोनाच्या पुर्वीच्या लाटांचे अनुभव कोणालाच चांगले नसल्याने श्रीमंत सत्यजीतराजे व श्रीमंत मिथिलाराजे यांचा विवाह सोहळा हा घरगुती स्वरुपात संपन्न होणार आहे. या नवदाम्पत्यांची ओळख फलटण – कोरेगांव तालुक्यासह सातारा जिल्ह्याला लवकरच करुन देण्यात येईल, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!