
स्थैर्य, कोळकी, दि. १२ : कोळकी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाच्या प्रचारासाठी युवानेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे व पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे हे कोळकी प्रभाग क्रमांक ६ चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जगदेवराव नाईक-निंबाळकर, राधिका पखाले व तेजश्री मुळीक यांच्या प्रचारार्थ येणार आहेत. तरी कोळकी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी ठिक ९ वाजता कोळकी येथील अक्षत नगर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.