सतीश कौशिक यांच्या निधनाने अष्टपैलू कलाकार हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । मुंबई । सतीश कौशिक यांच्या निधनाने अष्टपैलू कलाकार हरपला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

मंत्री श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, “सतीश कौशिक हे एक उत्कृष्ट अभिनेता आणि पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते.” मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. ‘राम लखन’, ‘साजन चले ससुराल’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले. सतीश कौशिक यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिका आजही लोकप्रिय आहेत आणि कायम राहतील, असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!