फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुसार मालाची आवक समाधानकारक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । फलटण । कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, फलटणच्या आवारातील रविवार दि. १३ फेब्रुवारीच्या साप्ताहिक भुसार बाजारात ज्वारी आवक २३५ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल १७०० ते २२०० रुपये, बाजरी आवक २०९ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल २००० ते २४०० रुपये, गहु आवक २८४ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल २००० ते २४०१ रुपये, हरभरा आवक ४२ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल ४००० ते ५२०० रुपये, मका आवक ८० क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपये, घेवडा आवक १०३ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल ५८०० ते ७५०० रुपये, खपली आवक ३ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल ३००० रुपये, उडीद आवक ५ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल ४५०० ते ५८०० रुपये, चवळी आवक २० क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल ४५०० ते ६२०० रुपये, तूर आवक ९ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल ४५०० ते ५५०० रुपये, मूग आवक २९ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल ५१०० ते ६३७५ रुपये निघाल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!