फलटण तालुक्यात मुख्यमंञी व प्रधानमंञी ग्रामसडक योजनेतील रस्त्याची मंजुर कामे सुरु झाल्याने समाधान : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : लोकसभा निवडणूकी दरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  फलटण तालुक्यातील रस्त्यांची कामे मुख्यमंञी व प्रधानमंञी ग्रामसडक योजनेतून मंजूर करुन घेऊन, सर्व रस्ते दर्जेदार होतील यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली होती, त्यानुसार सदर मंजूर कामे सुरु झाली असून फलटण ते विंचुर्णी रस्त्यांच्या कामांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः पाहणी करुन समाधान व्यक केले. 

फलटण तालुक्यातील मुख्यमंञी व प्रधानमंञी ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे लोकसभेत निवडून जाताच त्यांनी मंजूर करुन घेतली आहेत. त्यापैकी जुलै महिन्यात फलटण ते विंचुर्णी रस्त्याचे काम सुरु झाले आहे. अहिवळेवस्ती व पुढील पुलाच्या कामाची पाहणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. सुरु असलेल्या कामांना भेट देवून कामे दर्जेदार करावीत तसेच सर्व पुलांची कामेही चांगल्या प्रकारे करावीत, अशा सूचना ठेकेदार व संबंधीत अधिकारी यांना केल्या आहेत. 

तलावातील चढ काढण्याच्या सूचना  करताना तलाव्याच्या खालचा रस्ता सरळ करुन घेणे व साईड पट्टीला चांगला मुरुम टाकणे, जेथे काळी माती टाकली आहे, ती काढून तेथे मुरुम टाकणे आदी सूचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. 

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्या समवेत माजी संरपच सुशांत निंबाळकर, जयराम चव्हाण, सोसायटीचे व्हाईस चेअरमन माऊली निंबाळकर, पढरीतात्या इथापे, बाळासाहेब चव्हाण, सदिप अहिवळे, सुरज नलवडे, जयदिप निंबाळकर, डॉ. दिपक निंबाळकर, अमीत इथापे, बाळासाहेब नलवडे, नितीन गायकवाड, पिंटू चव्हाण, नवाआबा लकडे व ग्रामस्थ ग्रामपचायत सदस्य व सोसायटीचे संचालक उपस्थित होते.

विंचुर्णी ता. फलटण येथील ग्रामस्थांनी गावच्या तलाव व पंदरकी तलावात येणारे पाळीमध्ये धोम बलकवडीचे पाणी सोडावे अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!