दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२१ | लोणंद | लोणंद शहरालगत वाड्यावस्त्यांवर, प्रत्येक वसाहतीत नगरपंचायतीच्या माध्यमातून विकासकामे केल्याचे एक वेगळेच समाधान माझ्या मनाला आहे असे प्रतिपादन माजी समाज कल्याण सभापती व जेष्ठनेते आनंदराव शेळके – पाटील यांनी केले.
मी ज्या विभागाचे प्रतिनिधित्व केले त्या जुन्या वार्ड नंबर दोनने व आत्ताच्या प्रभाग क्रमांक नऊ ने या लोणंद शहराला ग्रामपंचायत सरपंच, नगरपंचायत प्रथम नगराध्यक्ष पद भुषविण्याची संधी दिली त्या जनतेचे प्रेम नेहमी डोळ्यासमोर ठेवून, त्यांच्या विश्वासाला पात्र राहून शक्य होईल तितकी विकासकामे व जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात देखील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी शेळके मामांनी सांगितले.
येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जात असताना लोणंद मधील नागरिकांना प्रत्येक प्रभागात कर्तृत्वान व जनसामान्यांचा सन्मान करणारा एक चांगला प्रतिनिधी देण्याचे काम केले जाणार आहे.
प्रभाग क्र.9 मधील चौदावा वित्तआयोगातून करण्यात येणाऱ्या श्री.धनंजय शेलार घर ते श्रीकाळभैरवनाथ मंदीर ते शरदकाका घोडके घर ते जगदंबा मंदिर येथील बंदिस्त गटार व काँक्रीटीकरण सुमारे 15.00 लक्ष रुपये कामाच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री.सोपानकाका क्षीरसागर हे होते.
यावेळी सौ. स्नेहलता शेळके-पाटील, ऍड.भारती शेंडे, नगरपंचायत अभियंता श्री.सागर मोठे सो., ढगेश गालिंदे, मोहनराव शेळके, संदीप शेळके, भारत शेळके, ऍड.हेमंत धायगुडे, अमोलकाका घोडके, धनंजय शेलार, महादेव क्षीरसागर, अविनाश कुसपे, सुरेश शेलार, सचिन गायकवाड, महादेव क्षीरसागर, सागर घोडके, मनोज गुरव, रामभाऊ काटकर, विक्रांत गोटी, महेश शेळके, सुनील बनकर, राजेंद्र जाधव, सनी ठोंबरे, अजय दुरगुडे, सनी दुरगुडे, रोहन धायगुडे, प्रतीक शेलार, अक्षय करंबळीकर, दिनेश पांचाळ तसेच प्रभागातील युवक व महिला उपस्थित होत्या.
स्वागत हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी केले व धनंजय शेलार यांनी आभार मानले.