
स्थैर्य, सातारा, दि. 17 सप्टेंबर : सातारा ही तत्कालीन मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांकडून हा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. ऐतिहासिक सातारचा यंदाचा विजया दशमी आणि सीमोल्लंघन सोहळा अधिक दिमाखदार होण्यासाठी राज्यशासनामार्फत साजरा करावा. राज्यशासन भारतीय संस्कृतीच्या प्रथा आणि परंपरांचा नेहमीच सन्मान करीत आले आहे, असे प्रतिपादन श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तींय आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर यांनी दिली.
ऐतिहासिक सातारचा यंदाचा विजया दशमी आणि सिमोल्लंघन सोहळा अधिक दिमाखदार आणि नेत्रदिपक होण्यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रमंडळ, रक्षक प्रतिष्ठान, राजे प्रतिष्ठान, शिवप्रेमी, श्रीमंत छत्रपती उदयनराजे समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येथील विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेतले असून, सर्वकार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन एकविचाराने यंदाचा शाही सिमोल्लंघन सोहळा मोठया उत्साहात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पाडला जाईल. लकरच या सोहळयाचे पूर्ण नियोजन आणि रुपरेखा लवकरच जाहिर केली जाईल, अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपतीउदयनराजे भोसले यांचे निकटवर्तींय आणि जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर यांनी दिली.
सातारा ही तत्कालीन मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांकडून, विजयादशमीच्या दिवशी विजया दशमी आणि सिमाल्लंघनचा सोहळामोठया दिमाखात आणि परंपरेने चालत आल्या प्रमाणे तितक्याच तोलामोलाने साजरा होत असतो. हा सिमोल्लंघन सोहळा राज्यशासनामार्फत साजरा होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राज्यशासन भारतीयसंस्कृतीच्या प्रथा आणि परंपरांचा नेहमीच सन्मान करीत आले आहे. राज्यशासनाने यंदापासून श्रीगणेशात्सव राज्य महोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय आणि कोल्हापूरचा शाही दसरा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्ण्य निश्चितच स्वागतार्ह आहे.
या पार्श्वभूमीवर साताराचा शाही दसरा व सीमोल्लंघन सोहळा भव्यदिव्य साजरा करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत असेही यावेळी सुनील काटकर यांनी सांगितले.यावेळी बाजारसमिती माजी संचालक काका धुमाळ, रक्षक प्रतिष्ठानचे सुशीलदादा मोझर, माजी जि.प. सदस्य बाळसाहेब गोसावी, समृध्दी, जाधव, ढाणेबापू, आदी मान्यवर उपस्थित होते.

