
स्थैर्य, 9 जानेवारी, सातारा : येथील श्री समर्थ सदन संस्कृतीक केंद्र .पंचपाळी हौद सातारा येथे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान आणि महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी नऊ पासून दुपारी तीन पर्यंत सुरू असलेल्या या महा आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिरात अनेक स्त्री-पुरुष रुग्णांनी आपल्या रक्त तपासण्या तसेच हिमोग्लोबिन, रक्तातील साखर यांच्या मोफत तपासण्या करून घेतल्या .या शिबिरामध्ये विशेष करून महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग होता.
या महाआरोग्य शिबिरामध्ये डॉ. अजिंक्य दिवेकर (हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडणी विकार, ताप, अशक्तपणा, छातीत दुखणे, श्वसनाचे विकार),डॉ. सौ. स्नेहल जगताप (अनियमित मासिक पाळी, पांढरा/जास्त स्त्राव, पोटदुखी, गर्भधारणा सल्ला),डॉ. सौ. अपर्णा भाकरे (डोळ्यांची जळजळ, मोतीबिंदू, नजर कमी होणे, डोळ्यात पाणी/दुखणे),डॉ. रोहित यादव (सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, फॅक्चर, गुडघेदुखी),डॉ. प्रमोद राजभोई (हार्निया, पाइल्स, फिशर, फिस्टुला, पोटातील शस्त्रक्रिया),डॉ. सौ. अश्विनी यादव (त्वचारोग, खाज, पुरळ, फंगल इन्फेक्शन, केस गळणे),डॉ. संकेत प्रभुणे (कान दुखणे, कमी ऐकू येणे, सायनस, घसा दुखणे, आवाज बसणे),डॉ. धीरज खडकबान (कर्करोग तपासणी, गाठ / जखम बरी न होणे, कर्करोगाबाबत सल्ला),डॉ. उदय सुर्यवंशी व्हिजन डायग्नोस्टिक सेंटर सातारा, डॉ. चैतन्य गोडबोले, डॉ. सौ. चैताली प्रभुणे (व्यसनमुक्ती सल्ला) (तणाव, चिंता, नैराश्य, झोप न लागणे,,डॉ. सुयोग दांडेकर (आयुर्वेद तज्ञ) (सांधेदुखी, आमवात, पचन विकार, वजन नियंत्रण, आयुर्वेदिक उपचार)हे तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते
या सर्व मान्यवर डॉक्टरांचा सत्कार रामनामी, शाल व समर्थ प्रसाद देऊन मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी रामदास स्वामींच्या मंदिरापुढे केला.
योगेश बुवा रामदासी म्हणाले की, समर्थ सेवा मंडळाच्या सेवाभावी उपक्रमात व वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा आरोग्य विषयक उपक्रम सादर करताना त्यामध्ये इच्छुक सातारकर स्त्री पुरुष समस्त भक्तांना याचा लाभ घेता आला याचा मोठा आनंद होतो. या शिबिरात अनेक मान्यवर आणि नामवंत धन्वंतरींनी विना मोबदला सेवा देऊन हे शिबिर यशस्वी पार पाडले. याचा मोठा आनंद होत आहे. रक्तदानासारखे महद पुण्य असे हे दान अनेक गरजू रुग्णांसाठी उपयोगी पडणार आहे. माऊली ब्लड बँकेचे डॉ. रमण भट्टड तसेच त्यांच्या सहकार्यांनी रक्तदान शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, खजिनदार समर्थभक्त अरविंद बुवा रामदासी, ज्येष्ठ समर्थ भक्त रमेशबुवा शेंबेकर रामदासी, विश्वस्त प्रवीण कुलकर्णी गुरुजी, संतोष वाघ,राजू कुलकर्णी, देसाई वहिनी, सौ.कल्पना ताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

