अवघ्या महाराष्ट्रामध्ये फक्त 10 दिवसात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेबसिरीज
स्थैर्य, बावधन, दि. १८ : सध्या लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाची साधने बंद असताना आणि मा.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या चित्रिकरणास परवानगी नंतर ते आपल्याच गावात १ ते १.५ किलोमीटरच्या भागात चित्रीकरण केलेल्या साताऱ्यातील एका वेबसिरिजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात तब्बल १,५०,००० हिट मिळवून या क्षेत्रातही आपला झेंडा फडकवला आहे. ‘गावची जत्रा कारभारी सतरा’ असे नाव असलेल्या या वेबसिरिजच्या निर्मितीचे सातारी जुगाडही असेच चित्तवेधक आहे.
सातारा शहराचे एक उपनगर असलेल्या प्रतापसिंह नगरचे नाव घेतल्यानंतर अनेकजण नाके मुरडतात. मात्र याच प्रतापसिंहनगर परिसरात राहणाऱ्या दोघा अवलिया कलाकारांनी अवघ्या चार जणांच्या मदतीने ग्रामीण भागातील दररोजच्या जीवणात होणाऱ्या अनेक प्रसंगातून खुमासदार कॉमेडी साकारत या वेबसिरिजमध्ये रंगत आणली आहे. या वेबसिरिजने आपल्या आठवडयात लाखोभराचा हिट मिळवून वेबसिरिजच्या दुनियेत खळबळ उडवून दिली आहे.
प्रविण भंगुरे वेबसिरिजचे, शुटींग, तसेच संकलन सोबत, दिग्दर्शनही तोच करतो. व त्याचा मित्र पृथ्वीराज लांडगे हा या वेबसिरिजचे लेखन करत ‘गावची जत्रा कारभारी सतरा’ या वेबसिरीजची निर्मिती त्या दोघांनी मिळून केली आहे. तर प्रविण या आधी अनेक बऱ्याच फिल्मचे, व शॉर्टफिल्मचे शुटिंग व एडिटिंग व अशी कामे केली आहेत. हे करत असताना त्याला जोड मिळाली ती पृथ्वीराज लांडगे या कलाकार मित्राची ग्रामीण भाषेवरील प्रभुत्व असलेला पृथ्वीराज हा या वेबसिरीजमध्ये लेखक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे पृथ्वीराज याने तुंबाड, बघतोस काय मुजरा कर, सातारचा सलमान, अशा चित्रपटात व जाहिराती व शॉर्टफिल्म मध्ये काम केले आहे. वेबसिरिजच्या संगीताची बाजू आनंद चव्हाण याने सांभाळली आहे.
या वेबसिरीजचे चित्रिकरणही या तरूणांने प्रतापसिंहनगर, खेड याच परिसरातच केले आहे. विशेष म्हणजे अत्यंत तुटपुंज्या साधनसामग्रीवर त्यांनी निर्माण केलेल्या वेबसिरिजची त्यांनी कुठेही कसलीही प्रसिध्दी केलेली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना देत आपले अस्तित्व निर्माण करत या तरूणांच्या टीमकडून समाजप्रबोधनाचा वसा आणि वारसा जपण्याचा केलेला कामाला समाजातून मिळत असलेली मान्यता या संपूर्ण टीमचे मनोधैर्य वाढवणारी आहे. व तसेच ग्रामपंचायत खेड, प्रतापसिंहनगर ग्रामस्थांनी व गावातील प्रतिष्ठित व्यंक्तींनी भलामोठा प्रेरणादायी पाठिंबा दिला असल्याने त्यांना अधिकच प्रेरणा मिळाली.
‘गावची जत्रा कारभारी सतरा’ ची चित्तरकथा साकारणाऱ्या आदित्या गायकवाड, निखिल कांबळे, सोनाली ओंबळे, ऋतुजा मोहिते, जितेंद्र मगरे, प्रविण साळवे आणि चेतन मगरे हे कलाकार असून सहाय्यक दिग्दर्शकाचे काम चेतन मगरे सांभाळत आहे.
आदित्य गायकवाड आणि निखिल कांबळे या दोन तरूणांनीही अत्यंत गरीबीतून प्रवास करत स्वत:च्या पायावर ऊभ राहण्याचा ठाम मताने आणि कौतुकास्पद अभिनय केला आहे.