
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : “लाखो जिभेवर अधिराज्य; आनंदाचे क्षण होताहेत खास” अशी ओळख असलेल्या साताऱ्याच्या प्रसिद्ध ‘देवत्व बेकर्स’च्या मावा केकला फलटण शहरातही खवय्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
‘देवत्व बेकर्स’चा हा मावा केक शंभर टक्के शाकाहारी असून, तो शुद्ध मावा, सुकामेवा आणि दर्जेदार साहित्यापासून बनवला जातो. अत्यंत रुचकर, मऊ आणि स्वादिष्ट असल्याने हा केक वाढदिवस, घरगुती समारंभ, सण-उत्सव तसेच प्रवासात नेण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरला आहे. मावा केकसोबतच लहान मुलांसाठी खास एगलेस चॉकलेट केक आणि व्हॅनिला बटर केक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह परदेशातही या केकला मोठी मागणी आहे. हाच प्रसिद्ध केक आता फलटणकरांसाठी बुरुड गल्ली येथील ‘भक्ती एंटरप्रायझेस’ येथे उपलब्ध झाला आहे.
या केकच्या दर्जेदार चवीमुळे हॉटेल व्यावसायिक, प्रवासी आणि सामान्य नागरिकही त्याचे चाहते झाले आहेत. अधिक माहितीसाठी भक्ती एंटरप्रायझेस, बुरुड गल्ली, फलटण (मो. ९४२१२१३६५६) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.