
स्थैर्य, फलटण : साताऱ्याचा प्रसिद्ध ब्रँड असलेल्या ‘देवत्व बेकर्स’च्या ‘देवत्व मावा केक’ची चव आता फलटणकरांनाही चाखता येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टपासून फलटण शहरात या केकच्या अधिकृत विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. पत्रकार यशवंत खलाटे पाटील यांच्या ‘भक्ती एंटरप्रायजेस’ येथे हा केक उपलब्ध झाला आहे.
‘चव आईच्या प्रेमाची’ अशी टॅगलाईन असलेला हा मावा केक आपल्या दर्जामुळे आणि चवीमुळे अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे. संपूर्णपणे शुद्ध शाकाहारी असलेला हा केक शुद्ध मावा आणि नैसर्गिक घटकांपासून बनवला जातो. प्रत्येक केकमध्ये एकसारखी चव आणि गुणवत्ता राखली जात असल्याने ग्राहकांच्या हाती नेहमी ताजा आणि स्वादिष्ट केक मिळतो, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
वाढदिवस, सण-समारंभ किंवा इतर कोणत्याही खास प्रसंगासाठी देवत्व मावा केक हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. फलटण शहरातील बुरुड गल्ली, कसबा पेठ येथे, पेंढारकर इलेक्ट्रॉनिक्स जवळ ‘भक्ती एंटरप्रायजेस’ मध्ये हा केक विक्रीसाठी उपलब्ध आहे. साताऱ्याचा हा दर्जेदार ब्रँड आता आपल्या शहरात उपलब्ध झाल्याने फलटणकरांना एक नवा अनुभव मिळत असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास यशवंत खलाटे पाटील यांनी व्यक्त केला.
अधिक माहिती व ऑर्डरसाठी पत्रकार यशवंत खलाटे पाटील यांच्याशी ९८२२९७३३४४ किंवा ९४२१२१३६५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

