साताऱ्याच्या अभिषेक मोहिते बॅडमिंटन अकॅडमीला फलटण बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | जाधववाडी ता. फलटण येथील नरेंद्र जगताप बॅडमिंटन अकॅडमी येथे आयोजित केलेल्या फलटण बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३ जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. त्यात सातारच्या अभिषेक मोहिते बॅडमिंटन अकॅडमीने ७ बक्षिसे पटकावत फलटण बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा मान मिळवला.

स्पर्धेत सहभागी झालेल्या मनोज कान्हेरे अकॅडमी सातारा ४, नरेंद्र जगताप अकॅडमी फलटण २, वाई अकॅडमी ३, कराड शेटलर्स अकॅडमी १, सौरभ चव्हाण अकॅडमी उंब्रज ४, संग्राम कदम अकॅडमी सातारा १, सिया जिया अकॅडमी सातारा २ अशी पदके प्राप्त केली. एकूण २१६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
सातारा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ.वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सातारा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सुरेश साधले, सहसचिव निलेश फणसळकर,महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे कार्यकारी सदस्य चंद्रहास कान्हेरे,पंच राज जाधव, स्पर्धा संयोजक योगेश शेलार,जगताप बॅडमिंटन अकॅडमी संचालक नरेंद्र जगताप,राजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व स्पर्धकांनी अतिशय जिद्द आणि चिकाटीने खेळ केला.

त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.विजेत्या आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करते.येथील नरेंद्र जगताप हे स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत.त्यामुळे या अकॅडमीतील राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निश्चित चमकातील असा विश्वास छ.वृषालीराजे भोसले यांनी व्यक्त करून श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले हे नुसते खेळाडू नव्हते तर ते महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष असताना साताऱ्यामध्ये बॅडमिंटन खेळ रुजवला.त्यांच्यामुळे आज त्याला चांगले रूप आले आहे.

येथील स्पर्धेत सातारच्या खेळाडूंनी चांगले यश संपादन केले ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे असे श्रीमंत छ.वृषालीराजे भोसले यांनी सांगितले.नरेंद्र जगताप,राजेंद्र जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

गटनिहाय विजेते पुढीलप्रमाणे –

  1. १९ वर्षाखालील गट मुले – तनिष्क केंजळे (प्रथम),जयेश निंबाळकर (व्दितीय),गट मुली – अनन्या काटे (प्रथम), आर्या फलाने (व्दितीय),
  2. १७ वर्षाखालील गट मुले – तनिष्क केंजळे (प्रथम), ओम मुल्या (व्दितीय),गट मुली – अनन्या काटे (प्रथम), आर्या फलाने (व्दितीय),
  3. १५ वर्षाखालील गट मुले – ओम मुल्या (प्रथम),आदित्य पाटील (व्दितीय),गट मुली – आर्या फलाने (प्रथम), शामली सूर्यवंशी (व्दितीय)
  4. १३ वर्षाखालील गट मुले – कौस्तुभसिंह फुले (प्रथम), प्रेम फाळके (व्दितीय),गट मुली – श्रध्दा इंगळे (प्रथम), सूर्या कणसे (व्दितीय)
  5. ११ वर्षाखालील गट मुले – भावेश घोडके (प्रथम), श्लोक भोसले (व्दितीय),गट मुली – श्रध्दा इंगळे (प्रथम), मिताली महामुनी (व्दितीय)
  6. ९ वर्षाखालील गट मुले – रेयांश राऊत (प्रथम), अद्वैत कदम (व्दितीय),गट मुली – शरयु कदम (प्रथम), गौरी गोंडकर (व्दितीय)

पंच म्हणून कृष्ण जाधव,अनुज सावंत सोहम खिलारे,श्रेया जाधव यांनी काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!