
स्थैर्य, सातारा, दि. 3 नोव्हेंबर : रोटरी प्रांत 3132, रोटरी क्लब ऑफ सातारा व रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडे शीत शवपेटी सुपूर्द करीत लोकार्पण केले. यावेळी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी रोटरी क्लब ऑफ सातारा व रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.
रोटरी प्रांत 3132 चे 2024-25 चे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने रोटरी प्रांत 3132 मध्ये कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या सहभागातूनराबविलेल्या या प्रकल्पामुळे सातारा शहर व परिसरात आता अत्याधुनिक शवपेटी उपलब्ध झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी रोटरीच्या विविध उपक्रमांचेकौतुक करत नागरिकांच्या गरजेनुसार अतिआवश्यक शीत शवपेटी उपलब्ध केल्याबद्दल आभार मानले. रोटरी क्लब ऑफ साताराचे अध्यक्ष किशोर डांगे यांनीशीत शवपेटीच्या उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने ही शीत शवपेटी स्वीकारून रोटरीच्या समाजसेवेला सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा. डॉ. धनंजय देवी यांनी गेली 82 वर्षे रोटरी क्लब ऑफ सातारा हे सातारा शहरात करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. माजी रोटरी प्रांतपाल डॉ. सुरेश साबू (जालना), सामाजिक उत्तरदायित्व सहभागी कंपनी ओम्नी स्ट्रॉग स्टील अॅण्ड अलॉय (जालना) व मुडीज कुलिंग (जालना) यांच्या सहकायनि हा प्रकल्प शक्य झाल्याचे नमूद करत रोटरी क्लब ऑफ
सातारा अनेक सामाजिक प्रकल्प आंतरराष्ट्रीय रोटरीच्या सहकायनि राबविणार असल्याचे स्पष्ट केले. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य कदम यांनी शीत शवपेटीसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाहीत. फक्त गरजू कुटुंबाला वाहतूक खर्च व हाताळणी खर्च सोसावा लागेल, असे स्पष्ट केले. शीत शवपेटी निरंतर वापरली जाईल व उत्तम स्थितीत ठेवली जाईल, असे आश्वासन दिले. रोटरी क्लब ऑफ साताराचे 2024-25 चे अध्यक्ष जयंतीलाल पटेल यांनी शीत शवपेटीचे लोकार्पण झाल्याची औपचारिक घोषणा केली. कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव अभिजित लोणकर, मनोज गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुनील सांगळे, सदस्य सुभाष ताटे व बालाजी ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते

