सातारा विभागीय कुस्ती स्पर्धा: म्हसवडच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०३ जानेवारी २०२५ | फलटण | सातारा जिल्ह्यातील पाटण येथे बाळासाहेब देसाई महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत असलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडचे कुस्तीपटू अनेक पदके मिळवून परतले आहेत. या स्पर्धेत आण्णा प्रताप मदने (७४ किलो वजन गटामध्ये) फ्री स्टाईल प्रकारामध्ये दुसरा क्रमांक, तर समाधान आप्पा खांडेकर याने (७४ किलो वजन गटामध्ये) तृतीय क्रमांक मिळवला.

सागर खाडे (७७ किलो वजन गटामध्ये) ग्रीको रोमन क्रीडा प्रकारांमध्ये दुसरा क्रमांक व किरण शेंबडे याने (८२ किलो वजन गटामध्ये) तृतीय क्रमांक मिळवला. या यशस्वी खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विजेत्या संघाचे अभिनंदन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खजिनदार हेमंत रानडे, महाविद्यालय विकास समितीचे व्हा. चेअरमन व फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य श्रीमंत ॲड. पृथ्वीराज राजेमाने, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, फलटण क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, महाविद्यालय विकास समिती सदस्य नितीन दोशी, सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय दीक्षित, सर्व सी. डी. सी. सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे. त्यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!