
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । सातारा । गत पाच ते सहा महिन्यापासून जिल्हय़ात लसीकरण सुरु असून या कालावधीत काही अपवाद सोडता लसीकरण गतीने झालेले आहे. जिल्हय़ात 22 लाख 79 हजार 500 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजमितीस जिल्हय़ात पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 31 लाख 17 हजार 885 एवढे लसीकरण झाले असून ते उद्दिष्टपैकी 88 टक्के एवढे झालेले आहे. यामध्ये सातारा प्रथम, कराड द्वितीय व फलटण तिसऱया क्रमांकावर आहे.
जिल्हय़ात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 20 लाख 16 हजार 162 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 11 लाख 1 हजार 723 एवढी आहे. सातारा तालुक्यात 3 लाख 86 हजार 218 एवढे उद्दिष्ट होते ते 100 टक्के पूर्ण झाले असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 6 लाख 13ग्न हजार 815 एवढी झालेली आहे. दुसरा डोसही 59 टक्के पूर्ण झाला असून फक्त 1 लाख 59 हजार 802 नागरिकांनी दुसरा डोस घेतला की 200 टक्के लसीकरण पूर्ण आहे.
कराड तालुका दुसऱ्या क्रमाकांवर
कराड तालुक्यात 4 लाख 45 हजार 164 लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 5 लाख 96 हजार 413 एवढी झालेली आहे. त्यापैकी 3 लाख 88 हजार 430 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 88 टक्के लसीकरण पूर्ण झालेय. तर 2 लाख 7 हजार 983 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप 56 हजार 734 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 2 लाख 37 हजार 181 जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
फलटण तालुका तिसऱया क्रमांकावर
फलटण तालुक्यात 2 लाख 58 हजार 458 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 3 लाख 39 हजार 433 एवढी आहे. यामध्ये 2 लाख 29 हजार 154 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 1 लाख 10 हजार 279 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 29 हजार 304 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 48 हजार 179 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
पाटण तालुक्यात 75 टक्के लसीकरण
पाटण तालुका चौथ्या क्रमाकांवर असून तिथे 2 लाख 36 हजार 777 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 2 लाख 67 हजार 58 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 76 हजार 945 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 90 हजार 113 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 59 हजार 832 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 46 हजार 664 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
कोरेगाव तालुक्यात 84 टक्के लसीकरण
कोरेगाव तालुका पाचव्या क्रमाकांवर असून तिथे 2 लाख 397 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 2 लाख 62 हजार 913 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 67 हजार 872 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 95 हजार 41 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 32 हजार 525 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 53 हजार 356 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
खटाव तालुक्यात 82 टक्के लसीकरण
खटाव तालुका सहाव्या क्रमाकांवर असून तिथे 2 लाख 9 हजार 454 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 2 लाख 6 हजार 6 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 71 हजार 41 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 88 हजार 965 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 32 हजार 525 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 20 हजार 489 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
खंडाळा तालुक्यात 124 टक्के लसीकरण
खंडाळा तालुका टक्केवारीनुसार पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, उद्दिष्टानुसार सातव्या क्रमाकांवर असून तिथे 95 हजार 172 उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 86 हजार 283 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 17 हजार 888 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असून हे प्रमाण 124 टक्के एवढे आहे. तर 68 हजार 395 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर फक्त दुसरा डोस न घेणारे फक्त 26 हजार 777 नागरिक उरले आहेत.
वाई तालुक्यात 78 टक्के लसीकरण
वाई तालुका आठव्या क्रमाकांवर असून तिथे 1 लाख 54 हजार 838 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 84 हजार 807 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 20 हजार 794 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 64 हजार 13 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 34 हजार 44 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 90 हजार 825 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
जावली तालुक्यात 83 टक्के लसीकरण
जावली तालुका नवव्या क्रमाकांवर असून तिथे 82 हजार 448 उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 9 हजार 398 एवढी आहे. यामध्ये 68 हजार 751 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 40 हजार 647 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 13 हजार 697 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 41 हजार 801 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
माण तालुक्यात 84 टक्के लसीकरण
माण तालुका दहाव्या क्रमाकांवर असून तिथे 1 लाख 58 हजार 541 उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 96 हजार 787 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 32 हजार 590 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 64 हजार 197 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 25 हजार 951 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 94 हजार 344 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
महाबळेश्वर तालुक्यात 102 टक्के लसीकरण
महाबळेश्वर तालुका लोकसंख्येच्या निकषानुसार अकराव्या क्रमाकांवर असून टक्केवारीनुसार तो दुसऱया क्रमांकावर आहे. तिथे 52 हजार 33 उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 89 हजार 643 एवढी आहे. यामध्ये 53 हजार 30 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 36 हजार 613 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. फक्त 102 नागरिक पहिला डोस घेण्याचे राहिले असून 15 हजार 420 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.