स्थैर्य, सातारा, दि.२५: जिल्ह्यातील निर्बंध काहीसे शिथील करताच विनाकारण फिरणार्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर रस्त्यावर विनाकारण दहा फिरणार्यांवर कारवाई केली आहे.
इंद्रजीत अंकुश कणसे वय 30 रा. खिंडवाडी, योगेश गणेश पवार वय 27 रा. खिंडवाडी हे दोघे दि. 23 रोजी रात्री 12 वाजल्यानंतर यवतेश्वर रस्त्यावर हे आपल्या वाहनातून (एमएच – बीएम 96) विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. दरम्यान रात्री पाऊणच्या सुमारास संभाजी यशवंत जाधव रा. वर्धनगड, ता. खटाव हल्ली रा. गडकर आळी, सातारा हा यवतेश्वर रोडवर विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले.
त्याचप्रमाणे ललित बाळासाहेब रसाळ वय 28 रा. यादोगोपाळ पेठ, सातारा हा इनोव्हा (एएच. ए. जे. 4000) मधून विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. तर आकाश अतुल शालगर रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, रोहन जालिंदर पवार रा. शिवसुंदर कॉलनी, विकासनगर सातारा (वाहन क्र. एमएच- बीव्ही 5281), पार्थ बोधे वय 21 रा. सोमवार पेठ, सातारा गाडीवरून (एमएच 11 एडब्ल्यू 4302), शैलेश पुरुषोत्तम करंदीकर वय 49 रा. शाहूपुरी सातारा, धनंजय परशुराम अवसरे वय 48 रा. गुरुवार पेठ, सातारा (गाडी क्र. एमएच 11 एके 7106), रोहन जालिंदर पवार रा. शिवसुंदर कॉलनी, विकासनगर सातारा (गाडी क्र. एमएच- बी. व्ही. 5281) यवतेश्वर रस्त्याला विनाकारण फिरताना आढळून आले.
वरील सर्वांना जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीआरपीसी नुसार नोटीस बजावली आहे.