सातारा एसटी कामगारांची आगारासमोर जोरदार निदर्शनं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जिल्ह्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी सातारा आगाराच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व महागाई भत्ता या मागण्यांसाठी जोरदार निदर्शनं केली . गेल्या दिवसापासून जिल्हयात लाल परीची सेवा पूर्णतः बंद असून ऐन दिवाळीच्या तोंडावर बाहेरगावावरून प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत .

रोज जवळपास 625 गाड्या साताऱ्यावरून गाडया येतात आणि जातात. पण आज बेमुदत बंदमुळे सातारा मध्यवर्ती डेपोतून एकही गाडी सुटली नाही. ऐन दिवाळीच्या हंगामात कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने परिवहनलाही मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांनाही या त्रासाला सामोरे जावे लागता आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच इतर भत्तेही एसटी कर्मचाऱ्यांना लागू करावेत अशी मागणी केली आहे. हा बंद बेमुदत असल्याने तो कधी माघारी घेतला जाईल याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. पण तोपर्यंत प्रवाशांना ऐन दिवाळत या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारचे प्रतिनिधी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यात एसटीने जवळपास 17 टक्क्यांची भाडेवाढ केली होती. दिवाळीच्या हंगामात ही भाडेवाढ केल्याने प्रवाशांना याची झळ बसत आहे. त्यात आता आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


Back to top button
Don`t copy text!