३१ डिसेंबरपर्यंत सातारा – पुणे जुन्या कात्रज घाटात एकेरी वाहतूक


दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२२ । फलटण । कात्रज शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ (जुना कात्रज घाट) कि.मी. १२/०० ते २०/२०० या लांबीत घाट रस्त्याचे डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुन्या कात्रज घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे.

पुणे ते सातारा अशी कात्रज घाटतून एकेरी वाहतुक सुरु आहे. वाहनधारकांनी साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नवीन बोगद्यातून यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता ब. नि. बहिर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!