दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे सातारा प्रायमरी स्कूल सातारा मध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचे औचित्य साधून मराठी भाषेमध्ये भाषण स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका व कथाकथन सादर करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. वर्ग शिक्षिका जुनघरे त्याचबरोबर इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित पालक प्रतिनिधी सारिका पवार, डॉ. अदिती काळमेख व अमित काळमेख तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी ज्योति मेळाट या उपस्थित होत्या. त्यांनी शाळेमध्ये होत असणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रम व स्पर्धे बद्दल आपले मत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित रित्या संपन्न झाला.