सातारा पालिकेची आता शास्ती माफीची अभय योजना


दैनिक स्थैर्य । 6 जून 2025। सातारा। सातारा पालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कराची थकबाकी रक्कम जास्त असते त्या रकमेचा भरणा आर्थिक अडचणीमुळे वेळेवर होत नाही. यामुळे सातारा पालिकेने मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी अभय योजना जाहीर केली आहे.

या योजनेला 19 मे पर्यंतच्या 2025 थकीत मालमत्ताकरांच्या रकमेवरील शास्तीला अभय योजना लागू झाली आहे. या अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घेऊन शास्ती माफ करून घ्यावी असे आवाहन पालिकेच्या वसुली विभागाने केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था बिलाच्या न भरलेल्या रकमेवर दरमहा दोन टक्के शास्ती लावत असतात. मालमत्ताधारकाच्या एकूण थकबाकी मध्ये वाढवून त्याचा परिणाम कर वसुलीवर होतो. यावर उपाययोजनाम्हणून नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून केवळ कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहन मिळवण्याच्या टल दृष्टीने अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये 19 मे पर्यंत रोजी ज्या थकीत मिळकत धारकांची शास्ती थकबाकी आहे. अशा थकबाकी धारकांना नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 150 नुसार शासकीय अंशतः अथवा पूर्णतः माफ करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेसाठी अभय योजना एकदाच लागू होणार आहे. 19 मे पर्यंतच्या थकीत मालमत्ता कराचा रकमेवरील फक्त शास्ती योजना लागू आहे. ही योजना प्रोत्साहन पर आहे जे मिळकतधारक शासकीय वगळता इतर मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरतील. त्यांचे बाबतीत शास्तीच्या सवलतीचा प्रस्तावमंजुरीसाठी पाठवण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्याकरता नगरपालिकेच्या मिळकत धारकांनी विहित नमुन्यात अर्ज देणे आवश्यक आहे. जे मिळकतधारक अभय योजनेचा लाभघेऊ इच्छितात अशांकडून विहित नमुन्यात प्रकरण परतवे 50% पर्यंत किंवा त्याहून जास्त सवलत मागणी करता परिपूर्ण प्रस्ताव नगर पालिकेकडे सादर करावा, 19 मे 2025 नंतर थकबाकी शास्ती अभय योजना लागू राहणार नाही. प्रस्ताव सादर करताना आधार कार्ड, छायांकित प्रत, मालमत्ता कराच्या मागणी बिलाची छायांकित प्रत, संपूर्ण कराची रक्कम भरलेल्या पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच 2025 26 ची मालमत्ता कर व इतर करांची बिले तयार होऊन बिले वाटपाचे काम सुरू झालेले आहे. ज्यांना बिले मिळाले नाहीत त्या मिळकतधारकांनी माय सातारा अ‍ॅप वरून बिलांची प्रिंट काढून घ्यावी आणि तो अर्जासोबत सादर करावी असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!