स्थैर्य, सातारा, दि. १३ : सातारा शहरात मास्क न लावणारे नागरिक, सोशल डिस्टनन्स न पाळणारे व्यापारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सातारा पालिकेने आता पाच पथके नेमली आहेत.पाच पथकाना कडक कारवाईचे आदेश मुख्याधिकारी रंजना गगे यांनी दिले आहेत.आतापर्यंत नियम मोडणाऱ्याकडून साडे चोवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.तसेच पालिकेत विनाकारण कोणीही येत असेल तर प्रवेश दिला जात नाही.प्रवेशद्वारातच त्याची विचारपूस नोंद करून तेथूनच परत पाठवले जात आहे.मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी कडक नियम लागू केले आहेत.
शहरात नियम न पाळणारे अनेक नागरिक आहेत.जे बाजार पेठेत खुले आम पणे फिरत आहेत.त्याना कोरोनाचे कसलीही भीती राहिली नाही.मास्क असून तो तोंडाखाली असतो.नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.सोमवारी सकाळी मुख्याधिकारी रंजना गगे यांनी पालिकेच्या सर्व खाते प्रमुख यांची बैठक घेत पाच टीम नेमल्या आहेत.कारवाईचे अधिकार त्या टीमला दिले आहेत.आजपर्यंत ही सातारा पालिकेच्या पथकाने साडे चोवीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.सोमवारी या पथकांची नेमणूक केली पासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तसेच पालिकेच्या मुख्य इमारतीत यायचे असेल तर ओळखपत्र आवश्यक, काम असेल तर बाहेरच नोंद केली जाते महत्वाचे काम असेल तरच प्रवेश दिला जात आहे.