स्थैर्य, सातारा, दि. 31 : सातारा शहराला आज दुपारी एकच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. मेघ गर्जनेसह पडणाऱ्या पावसाच्या सरींनी रस्ते लगेच सूने सुने झाले. त्यातच वीज पुरवठा खंडित झाला. अनेक जण आज रविवारी खरेदी साठी बाहेर पडल्याने या सर्वांना पावसापासून बचाव करताना अक्षरशः गोंधळून टाकले. अनेकांनी पळ काढला आणि आसरा शोधला. जोराच्या सरींनी हवेत गारवा निर्माण झाल्याने सर्वांना हायसे वाटले. आज सकाळी हवेत उष्मा होता. उकाडा जाणवत होता.
या पावसाने झोडपून काढले यामुळे रस्ते पानिमय झाले होते. या पावसाने उन्हाळी भुईमुग. काढणीला आलेल्या आंबा पीकचे मोठे नुकसान झाले. पावसाने करंजे येथील एका बांधकाम सुरू असलेल्या ईमर्तीचा पत्रा उडून गेला आणि अनेक मोठी झाडे उन्मळून पडली.