स्थैर्य, सातारा, दि. २९ : सातारा जिल्ह्यात सध्या करोना चाचण्यांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे यामुळे आता यापुढे करोना केअर सेंटर मध्ये करोना ची कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत .आणि याला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सध्या वाढ करण्यात आलेल्या पाच दिवसाचा लॉक डाऊन येत्या एक ऑगस्टपासून उठवला जाईल व जिल्हा पुन्हा सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केली .
ते पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यात टेस्टिंग चे प्रमाण वाढले असून पूर्वी दिवसाला तीनशे ते साडेतीनशे पर्यंत चाचण्या घेतल्या जात होत्या. सध्या दिवसाला 650 -700 च्या पर्यंत चाचण्या घेतल्या.या चाचण्या आणखीन वाढवल्या जाणार आहेत. . घेऊन पुण्याला चाचणीसाठी पाठविला जात होता मात्र शासनातर्फे आली असून त्यामुळे जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे करून बाधितची संख्या वाढण्याची शक्यता आहे .मात्र लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही .एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये हा प्रशासनाचा प्रयत्न असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सातारा जिल्ह्यातील असलेला 31 जुलै पर्यांचा लॉकडाऊन एक ऑगस्ट पासून ठेवला जाणार आहे एक ऑगस्ट पासून लोकांनी स्वतः मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हाताची स्वच्छता ठेवणे या तीन गोष्टी विशेष करून करोना रोखण्यासाठी पाळल्या पाहिजेत.