सातारा जिल्हा मनसे चित्रपट सेना जिल्हाध्यक्षपदी राज पुजारी सातारा जिल्हा मनसे चित्रपट सेना कार्यकारिणी जाहीर


 

स्थैर्य, सातारा, दि. २० : महाराष्ट्रातील मराठी कलाकार बांधवांच्या पाठीशी थांबणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा जिल्हा मनसे चित्रपट सेनेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या नूतन कार्यकारणीत सातारा जिल्हाध्यक्ष पदी राज पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर व उपाध्यक्ष रमेश भाई परदेशी यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सातारा जिल्हा मनसे चित्रपट सेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या नूतन कार्यकारणीत सातारा जिल्हाध्यक्ष पदी संनकी चित्रपटाचे दिग्दर्शक राज पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर व उपाध्यक्ष रमेश भाई परदेशी यांच्या हस्ते राज पुजारी यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिका नगरसेवक किशोर साहेब शिंदे व अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहीर करण्यात आलेल्या नूतन कार्यकारणीत कोरेगाव तालुकाध्यक्षपदी विनायक विजय गोरे, कोरेगाव शहराध्यक्षपदी सुमित बर्गे, मान खटाव तालुकाध्यक्षपदी आकाश कदम व शहराध्यक्षपदी अनुप भंडलकर, जावली तालुका अध्यक्षपदी सुरज लक्ष्मण खवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा मनसे चित्रपट कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सातारा जिल्हा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विकास दादा पवार, युवराज पवार, कराड उत्तर चे जिल्हा उपाध्यक्ष राजू दादा केंद्रे, वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे मयूर दादा, कोरेगाव तालुका अध्यक्ष सागर दादा बर्गे व सातारा शहराध्यक्ष राहुल दादा पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!