जनावरांमधील लम्पी त्वचा या रोगासाठी सातारा जिल्हा “ नियंत्रित क्षेत्र ” म्हणून घोषित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचा या संसर्गजन्य रोगाचा जनावरांमध्ये प्रादुर्भाव झालेला असल्याने संपूर्ण सातारा जिल्हा जनावरांमधील लम्पी त्वचा या रोगासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घोषित केला असून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत.

लम्पी त्वचा रोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करता येईल आणि (गुरे व म्हशी) आणि गोजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी यांना ज्या ठिकाणी ते पाळले जातात त्या ठिकाणापासुन उक्त नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करीत आहे.

कोणत्याही व्यक्तीस, उक्त बाधीत गोजातीय प्रजातीचे जीवंत अथवा मृत प्राणी, कोणत्याही उक्त बाधीत झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यापासूनचे अन्य कोणतेही उत्पादन उक्त नियंत्रित क्षेत्रामधुन बाहेर नेण्यास मनाई करीत आहे.

कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यांस मनाई राहील.

उक्त नियंत्रित क्षेत्रांमधील बाजारपेठेत, जत्रेत,प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उक्त बाधीत झालेल्या गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणेस मनाई राहील.

प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्हयातील ज्या भागातील पशुपालकांचे गोजातीय व म्हैस जातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष होकारार्थी येतील अशा ठिकाणापासुन 5 कि.मी त्रिजेच्या परिघामधील सर्व संक्रमित न झालेले जनावरांचे लसीकरण (रिंग व्हॅक्सीनेशन)  त्वरीत करुन रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!