दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांना चौकशीच्या नावाखाली आज 26 जुलै रोजी ईडी कार्यालयात पुन्हा दुसऱ्या वेळी बोलावून त्रास देण्याचा व पोलीस बल वापरून दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या व तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्तने आज निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रताप सिंह देशमुख, सहकार विभागाचे प्रदेश सरचिटणीस मनोज कुमार तपासे, बाबासाहेब कदम, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, शहराध्यक्ष रजनीताई पवार, दत्तात्रय धनवडे, रफिक शेठ बागवान, आधी प्रमुख कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
सोनिया गांधी यांना वेळोवेळी ईडी कार्यालयात बोलावून त्रास देण्याचा प्रयत्न केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकारकडून वारंवार होत असून मोदी सरकार विरोधकांना टार्गेट करून विरोधी पक्ष संपवण्याचा डाव टाकत आहे. या देशातील काँग्रेस कार्यकर्ते बळी पडणार नसून मोदी सरकारच्या या दडपशाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होऊन मोदी सरकारचा विरोध करील, असे असे यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हा प्रभारी श्रीराम चव्हाण म्हणाले की, सोनिया गांधी यांना मोदी सरकारकडून त्रास देऊन काँग्रेस विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, मोदी सरकारने ही लक्षात ठेवावे काँग्रेस ही तळागाळात रुजली असून काँग्रेस कार्यकर्ता केंद्र सरकारच्या विरोधात पेटून उठेल. याची केंद्र सरकारने जाणीव ठेवावी. यापुढे काँग्रेस कार्यकर्त्या मोदी सरकारच्या झुंडशाही विरोधात विरोधात आक्रमकपणे आंदोलन करेल, अशाही त्यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी या आंदोलनामध्ये प्रदेश सचिव धनश्रीताई महाडिक, सुषमा राजे घोरपडे, मालन परळकर, मनीषा पाटील, मोहसीन बागवान, विक्रांत चव्हाण, महेश काळे, दिलावर पैलवान, नाजीर शेख, विजय मोरे, लक्ष्मण चव्हाण, मुसा शेख, रजिया शेख, अजय शेख, अरुणा नाजरे, वाशिम सेठ इम्तियाज बागवान, अशोक काळे, त्रंबक ननवरे, निलेश महाडिक, अनिल कुंभार, सचिन गौर, सुवर्णा गोरे, वंदना जावळे, नित्य पाटणकर, राजन जवले, प्रिया जावळे, लक्ष्मी मोरे, रोहिणी मोरे, प्रवीण मोरे, प्रियंका जावळे, मंगला लाखे, इशा मोरे, पद्मा मोरे, सारिका पाटणकर, संगीता पाटणकर, पार्वती पाटणकर या आंदोलनामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.