स्थैर्य, सातारा दि.३१: शासनाच्या आदेशानुसार राज्यातील कोरोना (कोविड-19) च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत आदेश परित केलेला असून सदर लॉकडाऊन कालावधी 31 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार सातारा जिल्हयात 1 जानेवारी 2021 रोजीचे 00.00 वाजले पासून ते 31 जानेवारी 2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करणेत येत आहेत.
सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट (कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट तसेच इयत्ता 9 ते 12 चे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषता आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांचे वसतीगृह वगळून) या बंद राहतील. तथापी ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील, ऑनलाईन शिक्षण /दुरध्वनी आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील. त्यासाठी शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षततेबाबत निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औदयोगिक प्रशिक्षण उपक्रम (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मंडळ किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयामध्ये, नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उदयोजकता प्रशिक्षण घेणेस परवानगी राहील.
राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), भारतीय उदयोजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांना देखील परवानगी राहील. त्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील, उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण हे प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी, केवळ उच्च शिक्षण संस्था (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील.
केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाले नंतरच प्रयोगशाळा / प्रयोगात्मक कामांसाठी विदयार्थांना बोलवणेस परवानगी राहील, इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विदयापीठे, खाजगी विदयापीठे, इत्यादी, ते केवळ संशोधन अभ्यासक (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/ प्रायोगिक कामासाठी परवानगी राहील, सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करून काम करणेची परवानगी राहील, रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असलेस किंवा STANDARD OPERATING PROCEDURE नुसार चालू राहील, सर्व सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील. हॉटेल / फुड कोर्ट्स/रेस्टॉरंट्स आणि बारर्स यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील, ऑक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे, राज्य व केंद्र शासनाने कोव्हिड 19 बाबत ठरविलेल्या राजशिष्ठाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवट पर्यत प्रवास मुभा राहील, सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 9.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत, सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घरातच शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे पालन करुन नूतन वर्षाचे स्वागत करावे.