दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । सातारा । सातारा जिल्ह्यातील सुमारे 2000 खतविक्रेत्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले . सातारा जिल्हा रासायनिक खते बियाणे कीटकनाशके डीलर असोसिएशन दे आज उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या दिला जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले रासायनिक खत उत्पादकांकडून दुकानदारांना होणारे लिंकिंग एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय आणि शासनाच्या होणाऱ्या आदेशाचे उल्लंघन रासायनिक खते बी बियाणे कीटकनाशके यांचे नमुने अप्रमानित आल्यानंतर होणाऱ्या कारवाईला विक्रेत्यांना जवाबदार धरू नये संदर्भात यावेळी मागणी करण्यात आली.
मंगळवारी जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक खत विक्रेत्यांची दुकाने बंद राहिल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच अडचण झाली रासायनिक खत उत्पादकांनी स्वतःच्या फायद्यासाठी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत प्रमोशनल ऍक्टिव्हिटी म्हणजेच खताचे लिंकिंग करणे असा सोयीस्कर अर्थ लावला आहे संबंधित खत उत्पादकांना केंद्र शासनाचे निर्देश असतानाही उत्पादक कंपन्या खताची पोच वेळेवर करत नाही तसेच त्याचे वेगळे भाडे सुद्धा आकारतात त्यामुळे 1955 च्या खत उत्पादक आदेशाचे उल्लंघन होत आहे आणि त्यासाठी सातारा जिल्ह्याला पुरवठा करणाऱ्या खत उत्पादक कंपन्यांचा हा कारभार सुरू असून होणाऱ्या लिंकिंग ला ते जबाबदार आहेत त्यामुळे खत उत्पादक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
खताचे नमुने अप्रमाणिक आले तर 1968 मधील 16 नंबर तरतुदीनुसार त्यास पूर्णपणे उत्पादक जबाबदार आहे अशी तरतूद असताना कृषी विक्रेत्यांना आरोपी केले जाते आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते त्याचप्रमाणे बी बियाणे व खत हे सुद्धा सीलबंद खरेदी विक्री करत असल्यामुळे सदर कारवाही फक्त उत्पादकावर व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात उत्पादक कंपन्यांना निर्देश देऊन त्यांनी तशी लेखी हमी द्यावी अन्यथा या पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा खत विक्रेता डीलर असोसिएशन ने दिला आहे.