सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी ग्रामीण विकासात देशात ठसा उमटविला! मा. श्री. शेखर सिंह, माजी जिल्हाधिकारी, सातारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह यांचा निरोप समारंभ आणि नूतन जिल्हाधिकारी मा. श्री. रुचेश जयवंशी यांचा सत्कार समारंभ सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडला. सदर वेळी बँकेचे अध्यक्ष मा. श्री.नितिन पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई तसेच संचालक श्री. सुरेश सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी सौ. माधवी सरदेशमुख, पोलीस उपाधिक्षक अंचल दलाल, श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे यांचे हस्ते श्री.
शेखर सिंह आणि नूतन जिल्हाधिकारी मा. श्री. रुचेश जयवंशी यांचा सत्कार करणेत आला.

याप्रसंगी श्री. शेखर सिंह म्हणाले, सातारा जिल्हा हा छ. शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाने आणि पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा असून
स्वराज्याची राजधानी असलेल्या या भूमीमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करणेची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. याच बरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकीक देशभर असून बँकेचे बँकिग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख केलेले कामकाज हे देशातील सहकारी बँकांसाठी आदर्शवत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पत पुरवठा उद्दिष्टपुर्तीमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून बँकेची उज्वल परंपरा वृदिंगत केले असलेचे गौरोदगार यावेळी श्री. शेखर सिंह यांनी काढले. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून जिल्हा बँकेने शेतकरी तसेच अन्य घटकांना एकत्र घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन किसान विकास मंचाची स्थापना केली आहे. या किसान विकास मंचाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यावसायिक व उच्च तंत्रज्ञानाची कास धरून शेती कशी करायची यासाठी
जिल्हा बकेचे हे एक विद्यापीठच आहे. बँकेने जिल्ह्याच्या कृषी विकासात देशात ठसा उमटविला असलेचे सांगून बँकेचे विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले. याप्रसंगी श्री. रुचेश जयवंशी म्हणाले, कोणत्याही संस्थेचा विकास हा गुणात्मक व दर्जात्मक कार्यपध्दतीमुळे होत असतो व गुणात्मक कार्यपध्दतीमुळे संस्थेला नावलौकिक प्राप्त होत असतो. अशा या नावलौकिक सातारा जिल्हा बँकेची कार्यपद्धती समजावून घेणेसाठी बँकेस अवश्य भेट देणार असलेचे सांगून यापुढील काळातही जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी सातारा जिल्हा बँकेस सहकार्य करणार असलेचे सांगून बँक उत्तरोत्तर प्रगती पथावर रहावी, ही शुभकामना यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. नितिन पाटील म्हणाले, यशवतंराव चव्हाण, आर डी पाटील, बाळासाहेब देसाई, आबासाहेब वीर, इत्यादि महान नेत्यांचे विचारांतून या बँकेची स्थापना झालेली असून बँकेला सुरुवातीपासून चांगले नेतृत्व व पाठबळ लाभले असलेने बँकेचा गुणात्मक विकास झाला आहे. बँक आज तळमळीने व निष्ठेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचली असून विविध प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत असलेचे नमूद केले . बँकेचे उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई म्हणाले, बँकेची स्थापना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेली आहे. साहेबांचा कृषी विकासाचा संकल्प व कृषी औद्योगिकरणाचा ध्यास बँकेने आपल्या प्रत्येक योजनेत कार्यान्वित केलेला आहे. शेतक-याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेने अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, मार्च २०२० मध्ये श्री. शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरोना महामारीचे संकट जिल्ह्यावर आले होते. या महामारीत महसूल विभागाची यंत्रणा हाताशी घेऊन त्यांनी महामारीचा धैर्याने मुकाबला केला. जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न तसेच विविध विकास योजना, जंबो कोविड हॉस्पिटल, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, भूस्खलनग्रस्तांना मदत आदी महत्वाच्या प्रसंगी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन जनतेला जास्तीत जास्त मदत केली. कृषि व कृषिपुरक योजना व शेतीतील अधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यत पोहचावे याकरिता बँकेने यशवंत किसान विकास मंचाची स्थापना केली.
तसेच बहुतांशी शेतकरी वर्ग शेतीमालाची गुणवत्ता मुल्यवर्धित व्हावी, शेतमालाची नासाडी होवू नये त्याची योग्य प्रकारे साठवणूक व्हावी
तसेच योग्यवेळी माल बाजारपेठेत विक्रीकरिता उपलब्ध करून देता यावा, मालास योग्य भाव प्राप्त व्हावा याकरिता बँक व किसान विकास मंचाच्या माध्यमातून तसेच श्री. शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी मेळावे चर्चा सत्र व शिवार फेरी आयोजित केले. बँकेच्या माध्यमातून केलेल्या कृषी विकासात श्री. शेखर सिंह यांचे लाभलेल्या योगदानाबद्दल डॉ. सरकाळे यांनी श्री. शेखर सिंह यांचे आभार व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. तसेच राज्य बियाणे महामंडळ अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अत्यंत काटेकोर आणि प्रशासकीय शिस्तीचे अधिकारी म्हणून श्री. जयवंशी यांची ख्याती असलेचे सांगून त्यांना पुढील वाटचालीस शुभेछ्या दिल्या.


Back to top button
Don`t copy text!