दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२१ | फलटण | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज संचालक मंडळावरील २१ पैकी ११ जागांची निवड बिनविरोध झाली असून त्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले, आ. मकरंद पाटील, श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, दत्ता नाना ढमाळ, नितीन पाटील, राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, सुरेश सावंत, लहुराज जाधव यांचा समावेश आहे, तर उर्वरित १० जागांसाठी २० उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत.
इतर मागास वर्गीय मतदार संघातील एका जागेसाठी शेखर भगवान गोरे व प्रदीप बापूसाहेब विधाते, नागरी बँका मतदार संघातील एका जागेसाठी रामराव आनंदराव लेंभे व सुनील ज्ञानदेव जाधव, महिला मतदार संघातील २ जागांसाठी कांचन सतीश साळुंखे, ऋतुजा राजेश पाटील, चंद्रभागा शंकर काटकर आणि शारदादेवी सुर्याजीराव कदम हे ४ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत.
सोसायटी मतदार संघातील ११ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ६ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत त्यामध्ये जावली मधून ज्ञानदेव किसन रांजणे आणि आ. शशिकांत जयवंतराव शिंदे, कराड मधून अड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर व ना. शामराव उर्फ़ बाळासाहेब पांडुरंग पाटील, पाटण मधून ना. शंभूराज देसाई आणि सत्त्यजितसिंह पाटणकर, कोरेगाव मधून शिवाजीराव आनंदराव महाडिक व सुनील खेलचंद खत्री, खटाव मधून प्रभाकर देवबा घार्गे व नानासाहेब उर्फ़ नंदकुमार महादेव मोरे आणि माण मधून मनोजकुमार सदाशिव पोळ व शेखर भगवान गोरे निवडणूक आखाड्यात आहेत.