स्थैर्य, फलटण, दि. २३: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यास रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा संचारबंदी लागू केल्याचे आदेश जारी केलेले आहेत. याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आलेल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील सीमा ह्या सांगवी येथे सातारा व पुणे जिल्ह्याच्या सिमा आहे तर राजुरी येथे सातारा व सोलापूर जिल्ह्याची सीमा आहे. ह्या दोन्ही सीमा ह्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने दोन्ही सीमा ह्या बंद करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरिक्षक नितीन सावंत यांनी दिली.
सध्या सातारा जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात कोरोना रूग्णांचे प्रमाण हे झपाट्याने वाढत चाललेले आहेत. त्यामुळे संपुर्ण राज्यात कडक निर्बंध हे लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे एका जिल्ह्यातुन दुसर्या जिल्ह्यात जाताना कडक निर्बंध आहेत. जर कोणाला एका जिल्ह्यातुन दुसर्या जिल्ह्यात जायचे असेल तर त्यांना आता ई-पास काढुनच जाता येता येत आहे. त्या मुळे फलटण तालुक्यातील जिल्ह्याच्या सीमा ह्या बंद करण्यात आल्या असुन शासन नियमानुसारच जा ये करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असेही पोलीस निरिक्षक नितीन सावंत यांनी स्पष्ट केले.