सातारा जिल्हा भाजपाचा भिलार येथे आजपासून अभ्यासवर्ग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२३ । सातारा । सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग भिलार ( पाचगणी ) येथे आजपासून आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी दिली.

आज शनिवारी सकाळी ९ वाजता नोंदणी तर १० ते १२ वाजेपर्यंत स्वागत, प्रास्ताविक, इतिवृत्त मंजूरी, उद्घाटनपर मार्गदर्शन होणार आहे. दुपारी १२ वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे. दीड वाजता माजी मंत्री स्व. सुषमा स्वराज अवार्ड विजेत्या महिलांचा सत्कार, तीन वाजता संघटनात्मक रचना आघाडी मोर्चा कार्यपद्धती,जनसंघ ते भाजपा प्रवास, मिडिया व सोशल मिडिया आणि रात्री सामुहिक चर्चा होणार आहे.

रविवारी आपली कार्यपद्धती, बुथ सशक्तीकरण, राजकीय प्रस्ताव, कृषी व सहकार प्रस्ताव, मान्यवर आणि अध्यक्षीय भाषणे होणार आहेत. सदर अभ्यासवर्गाला भाजपाचे वरिष्ठ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सर्व मंडल अध्यक्ष, मतदारसंघांचे प्रभारी आणि पदाधिकारी,जिल्हा आणि मंडल महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी, सर्व कमिट्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!