दैनिक स्थैर्य । दि. ०७ मे २०२२ । सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेच्या वतीने सेवा सोसायटी व व्यक्तिगत कर्ज वितरणाच्या व्याजदरांमध्ये एक ते तीन टक्के कपात केल्याची घोषणा केली. याची माहिती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी पत्रकारांना दिली यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आणि बँकेचे इतर सर्व संचालक उपस्थित होते.
चेअरमन नितीन पाटील पुढे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेने आजवर सात लाखाच्या वर कर्जदारांना वित्तपुरवठा केला आहे .विनम्र आणि तत्पर सेवा देणाऱ्या बँकेने जिल्ह्याची अर्थवाहिनी अशी ओळख निर्माण करून देशपातळीवर आपले नाव उंचावले आहे .गेल्या दोन वर्षापासून करोना महामारी मुळे ठप्प झालेले अर्थचक्र त्यामुळे व्यापाराला गती देण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या हेतूने बँकेच्या संचालक मंडळाने व्याजदर कपातीचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे . संपूर्ण जिल्ह्याचे सर्वसामान्य घटकांचे अर्थकारण सुधारावे व बँकेच्या विविध योजनांचा शेतकरी सभासद घटकास लाभ व्हावा या दृष्टिकोनातून बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
बँकेच्या 319 शाखांमार्फत वित्त पुरवठा केला जातो प्राथमिक विकास सेवा सोसायटी यांच्या 68 योजनांच्या माध्यमातून हा वित्त पुरवठा होत असतो याशिवाय व्यक्तिगत कर्ज मध्ये सुद्धा विविध 47 योजना आहेत बिगरशेती कर्ज विभागांमध्ये सुद्धा पाच प्रकारच्या माध्यमातून वित्तपुरवठा केला जातो या सर्व पुरवठ्याच्या व्याजदरांमध्ये एक ते तीन टक्के व्याजदर कपात करण्यात आली असून या योजनेचा लाभ 1 मे पासून सभासदांना देण्यात येणार आहे ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने कोणत्याही कर्ज योजना लागू होणार नाही या निर्णयामुळे बँकेच्या तिजोरीवर 17 ते 18 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे मात्र जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत सक्षम असल्यामुळे हा बोजा सहन करण्याची ताकद बँकेमध्ये असल्याचे नितीन पाटील यांनी स्पष्ट केले
या व्याज दर कपातीच्या निर्णय या संदर्भात बोलताना उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँकेने राष्ट्रीयकृत बँकांच्या दरा इतकाच व्याजदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे 10.5 व्याजदराने विकास सेवा सोसायटी च्या माध्यमातून पतपुरवठा जिल्हा बँक करणार आहे महाराष्ट्रात सर्वात कमी व्याजदराने पतपुरवठा करणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव आहे या धोरणात्मक निर्णयाची सभासद शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे म्हणाले विकास संस्थान मार्फत विविध प्रकल्प उभारणी करता विविध कर्ज योजना च्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो सण 2021- 22 मधील 12355 सभासदांना 24 हजार 911 पॉईंट 32 लाख कर्ज वाटप केले आहे बँकेने राज्यात कर्ज वाटपाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे संचालक मंडळाने सर्व योजनांच्या कर्ज वाटपावर व्याजदरांमध्ये एक ते दोन टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून फळबाग फुल शेती लागवड उपसा जलसिंचन ठिबक तुषार सिंचन सारख्या शेती उत्पादनात वाढ करून देणाऱ्या उत्पादक कर्ज योजनांसाठी सभासदांना साडेदहा टक्के तर शेतकरी निवास सर्वसामान्य कर्ज योजनेसारख्या अनुत्पादक करण्यासाठी 11 टक्के व्याज दर लागू आहे क्षारपड जमीन सुधारणा कर्ज योजनेअंतर्गत सवलतीचा दर दहा टक्के निश्चित करण्यात आला आहे तर शैक्षणिक कालावधीतील व्याज परतावा योजना गत दहा वर्षापासून चालू आहे शैक्षणिक कर्जदारांना शिक्षण कालावधीत शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते शैक्षणिक कालावधी समाप्ती नंतर शेतकरी सभासदांचा व्याजा वरील भार कमी करण्यासाठी बँकेने या योजनेला अत्यल्प 10 टक्के व्याजदर लागू केला आहे.