
दैनिक स्थैर्य | दि. 18 फेब्रुवारी 2025 | फलटण | फलटण तालुक्यात शरीराविरुद्धचे गुन्हे करणार्या दोन टोळ्यांमधील १३ इसमांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.
फलटण तालुक्यात रोहीत भिमराव जाधव, राहुल भिमराव जाधव, गौरव बाळासो भंडलकर, ऋतिक दत्तात्रय जाधव, विशाल बाळासो भंडलकर, छगन मोहन मदने सहित १३ इसमांच्या दोन टोळ्यांनी सातत्याने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. या टोळीने खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करुन मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गर्दी मारामारी करणे, दुखापत करून शिवीगाळ दमदाटी करणे असे गुन्हे केले होते.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुनिल महाडीक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी या प्रस्तावाची चौकशी केली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर सुनावणी होऊन हा आदेश पारित करण्यात आला.
या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२२ पासून म.पो.का. क ५५ प्रमाणे ३७ उपद्रवी टोळ्यांमधील १२८ इसमांना, म.पो.का.क ५६ प्रमाणे ३८ इसमांना, म.पो.का.क ५७ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १७० इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली आहे.