दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । फलटण । सातारा जिल्हा ऍम्युचर खोखो असोसिएशनची सन २०२२ ते २०२७ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यासोबतच फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, खो – खोचे राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब चोरमले व रहिमतपुरचे विक्रम माने यांची उपाध्यक्षपदी तर सचिव पदी खंडाळ्याचे महेंद्र गाढवे यांची निवड करण्यात आलेली आहे.
फलटण येथील मुधोजी हायस्कूल येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदरील निवडी या बिनविरोध करण्यात आल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांसह प्रदीप बंडगर, शशिकांत गाढवे व दिलीप शिंदे यांची सहसचिव पदी निवड करण्यात आलेली आहे.
सातारा जिल्हा अॅम्युचर खोखो असोसिएशनच्या संचालक पदी चंदन कर्वे, अमरसिंह देशमुख, मनीषा शिंदे, महेंद्र भोसले, संजय बोडरे यांची निवड करण्यात आलेली आहे. सोबतच संघटनेच्या विश्वस्त पदी प्रा. भिमदेव बुरुंगले, अनिल शिंदे, बाळासाहेब घाडगे, आमिर खान यांची निवड करण्यात आलेली आहे.
सदरील झालेल्या निवडीबद्दल राज्य खो – खो असोसिएशनचे मार्गदर्शक व विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, कृषी व सर्वच क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.