सातारा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये होतेयं बाधित मृतांच्या पार्थिवाची हेळसांड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ३१ : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात  करोनाबाधित मृतदेहांची हेळसांड होत आहे. असे मृतदेह दोन दोन दिवस अंत्यविधी शिवाय तसेच ठेवले जात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अमोल गडेकर यांना फैलावर घेतले आहे. तसेच मृतदेहाची होणारी हेळसांड ही बाब खूप गंभीर आहे. संबंधित विभागांनी समन्वय राखून कामे करावीत अशा शब्दात त्यांना चांगलेच ठणकावले आहे.

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार व त्यामुळे जिल्ह्याचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. या रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर्स यांचेवर कसलेच नियंत्रण न राहिल्याने जिल्हावासीयांना प्रचंड वाईट अनुभव येत आहेत.

मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील करून बाधितांच्या मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे . करोना  बाधित रुग्णांची मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाहीत या मृतदेहांवर शासकीय यंत्रणाच अंत्यसंस्कार करत असते त्यासाठी संबंधित रुग्णालय आणि नगरपालिकेने समन्वय राखणे आवश्यक आहे. घरातील व्यक्तींना पुरवला संसर्ग होऊ नये म्हणून संबंधित मृताच्या कुटुंबावर दुःखाचा आघात असलाच तरी अशा वेळी शासकीय यंत्रणांनी त्यांना मानसिक आधार देण्याचे आणि सहकार्य करण्याची आवश्यकता असते. मात्र सिव्हिल हॉस्पिटल मध्ये संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर दोन दिवस होऊनही कुटुंबाला ही घटना कळवण्याची तसदी घेतली जात नाही. संबंधितांचा मृतदेह शवविच्छेदन विभागात  पडून असतो असे अनेक प्रसंग जिल्हा वासियांनी अनुभवले आहेत व अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात येऊन सिव्हिल सर्जन यांचे दालनात संबंधित विभागाच्या डॉक्टरांची बैठक घेतली आणि अशा प्रकाराबाबत प्रचंड संताप व्यक्त करून ही बाब गंभीर असून आता यापुढे तरी समन्वय राखून काम करा असा आदेश दिला आहे. तसेच पुढील काळात बाधित रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्यामुळे आतापासूनच आयसीयू बेड वाढवा swab टेस्टिंग प्रयोगशाळा बाबत पाठपुरावा करा असे आदेश दिले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!