दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । सातारा । धनगरवाडी ता सातारा येथे अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणारा योगेश अरुण नाईकनवरे या दोन वर्षापासून फरारी आरोपीला शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली . पुणे ग्रामीण परिसरातील उरुळी कांचन येथे पाळत ठेऊन पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला अटक केली .
16 फेब्रुवारी 2019 रोजी नाईकनवरे याने एकाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता . नाईकनवरे व त्याच्या साथीदारांवर चोरी रॉबरी व मारामारीचे गुन्हे दाखल होते . तो आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अर्तगत कारवाई करण्यात आली होती .अत्यंत सराईत गुन्हेगार हा गेल्या दोन वर्षापासून फरार होता . पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यां नी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पुणे येथे रवाना केले . पोलीस उपनिरीक्षक समीर कदम सुजित भोसले अविनाश चव्हाण पंकज ढाणे जोतीराम पवार अभय साबळे कचरे गणेश घाडगे विशाल धुमाळ विक्रम माने यांच्या पथकाने उरुळी कांचन ता हवेली जि पुणे येथे सापळा रचून नाईकनवरे याला अटक केली. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऑचल दलाल या करत आहेत.
महेश गजानन तपासे गुरुवार पेठ , उमेश गजानन तपासेरा गुरुवार पेठ , प्रसाद बाबर , शौर्यशील माने , राहुल शिंदे , किरण कल्पवृक्ष , गजानन तपासे गुरुवार पेठ , रोहित लोंढे , सनी अडसूळ प्रतापसिंह नगर हे सदर आरोपी मोक्का प्रकरणातील फरार आहेत . या आरोपी ची माहिती मिळाल्यास सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे .