प्रवाशांच्या गर्दीने सातारा बसस्थानक गजबजले


दैनिक स्थैर्य । 8 मे 2025। सातारा । जिल्ह्यात गावोगावी सुरू असलेल्या यात्रा, लग्नसराई, शालेय विद्याथ्यांना उन्हाळी सुट्टी वामुळे सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीन गजबजून गेले आहे. मुंबई, स्वारगेटसाठी दुपारनंतर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे विविध मार्गावर ज्यादा बसेस सोडण्यात येत होत्या..

सातारा बसस्थानकातून गोवा, बेळगाव, विजापूर, हैद्राबाद, कोकण, नांदेड, परभणी, लातूर, संभाजीनगर यासह राज्यातील विविध ठिकाणची बसेसची ये वा असते, विविध आगाराच्या बसेसच्या दररोज हजारो फेर्‍या होत असतात. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच सातारा बसस्थानकावर वर्दळ असते. सध्या गावोगावी यात्रा जत्रा, लघुसराई सुरू झाली आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. त्यामुळे नोकरी, व व्यवसायाच्यादृष्टीने बाहेर गावी असणार चाकरमानी उन्हाळी सुट्टीसाठी गावाकडे येत असतात. त्यामुळे सकाळपासूनच बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजून जात आहे.

लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार्‍या बसेस प्रवाशांनी हाऊसफूल भरून वाहताना दिसत आहेत. प्रवाशी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहून एसटीतून प्रवास करताना दिसत आहेत.

उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गावर सर्वच आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत, मात्र ज्या मार्गावर प्रवाशांची जादा गर्दी लक्षात घेता त्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात येत आहेत. दररोज दुपारनंतर स्वारगेट व मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागत आहेत मात्र बसेस उपलब्ध होतील त्याप्रमाणे सोडण्यात येत आहेत.

महामार्गावर ठिकठिकाणी ट्रॉफीक जाम होत असल्याने बसेसचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तिकीट आरक्षण केंद्रावर आगावू तिकीट नोंदणीसाठी प्रवाशांची गर्दी झाली होत असून सातारा रेल्वे स्थानकावरही प्रवासांची गर्दी होत आहे.


Back to top button
Don`t copy text!