माणदेशी संस्कृतीचे जतन करणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रीला सातारा भूषण हे मोठे औचित्य – न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचे गौरवोद्गार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२१ । सातारा । माणदेशी संस्कृतीचे जतन करणाऱ्या एका कर्तुत्ववान स्त्रीला सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे यामुळे चेतना सिन्हांचे काम किती मोठे आहे हे आपल्याला दिसून येते. दुष्काळी प्रदेशाला नव्याने ओळख करून देण्याची काम माणदेशी मुळे झाले असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी सातारा येथे बोलताना काढले.    रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट सातारा यांच्या वतीने यंदाचा एकतिसावा सातारा भूषण पुरस्कार माणदेशी महिलांच्या उन्नतीसाठी अविरत कार्य करणाऱ्या चेतना सिन्हा यांना  मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सत्यरंजन धर्माधिकारी बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह होते प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते यावेळी मंचावर चेतना सिन्हा यांच्यासह विजय सिन्हा , अरुण गोडबोले उपस्थित होते. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते रामनामी शाल , सन्मान चिन्ह व रोख रक्कम या स्वरुपात सातारा भूषण पुरस्कार चेतना सिन्हा यांना प्रदान करण्यात आला.      रचनात्मक कार्याशिवाय संघर्ष थीटा आहे. हे जाणून यांनी महात्मा गांधी आचार्य विनोबा व जयप्रकाश नारायण यांच्या विचाराने केलेले काम अतुलनीय असे आहे. कोणतेही सत्तेचे पद नसताना महिला सबलीकरण सक्षमीकरण करण्याचे काम अतिशय महत्वाचे आहे असे यावेळी बोलताना सत्यरंजन धर्माधिकारी यांनी सांगितले. महिलांना आर्थिक अधिकार नसताना त्यांच्यात आर्थिक साक्षरतेचे काम करणारी देशातील पहिली महिला बँक म्हणजे माणदेशी बँक व ती स्थापन करणाऱ्या चेतना सिन्हा यांचे काम अतिशय मोलाचे व महत्त्वाचे आहे सातारकर यांच्या दृष्टीने ते गौरवास्पद आहे असे विचार अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मांडले. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी माणदेशी संस्कृतीचा आढावा घेताना साहित्य-संस्कृती यांचे योगदान माणदेशांमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीत आहे असे सांगितले आणि एका कर्तुत्ववान स्त्रीच्या मागे तिचा पती अतिशय समन्वयाने काम करत आहे असे म्हटले . पुरस्कार प्रदान केल्यानंतर आपल्या सत्काराला उत्तर देताना चेतना सिन्हा यांनी यापूर्वी हा पुरस्कार माझे चळवळीतील गुरु शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांना मिळाला आणि त्यानंतर हा पुरस्कार मला मिळत होईल हा माझा सन्मान मी सर्व शेतकऱ्यांना समर्पित करते असे सांगून माझे पती विजय सिन्हा व माझा हा एकत्रित पहिलाच सत्कार आहे असे सांगितले. सातारच्या भुमितील हा माझा सत्कार अभिमानाचा व आनंदाचा आहे माझ्या कामाला सातारकरांनी भरपूर साथ दिलेली आहे हा माझा सत्कार नसून लाखो महिलांच्या सत्कार आहे माणदेशाचा सत्कार आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी सन्मान चिन्ह तयार करणारे डॉ. रवींद्र भारती व निवड समितीचे सदस्य असलेले सुजित शेख यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. रा.ना गोडबोले ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अरुण गोडबोले यांनी सातारा भूषण पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली आणि मानपत्राचे वाचन केले. डॉक्टर अरुण गोडबोले डॉक्टर अच्युत गोडबोले यांनी प्रास्ताविक केले प्रद्युम्न गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले तर उदयन गोडबोले यांनी आभार मानले या कार्यक्रमास सातारकर नागरिक ,  माणदेशी महिला ,  बचत गटाच्या महिला निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!