सासवड ते शिंगणापूर ‘संत भूतोजी महाराज कावड यात्रे’चे फलटणमध्ये भक्तीमय स्वागत; आ. सचिन पाटील यांच्या हस्ते महाआरती


सासवड ते शिखर शिंगणापूर जाणाऱ्या संत शिवभक्त तेली भूतोजी महाराज यांच्या कावड यात्रेचे फलटण (जिंती नाका) येथे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते पूजन व आरती करून भव्य स्वागत करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. 29 मार्च : सासवड ते शिखर शिंगणापूर अशी पायी जाणारी ‘संत शिवभक्त तेली भूतोजी महाराज’ यांची पवित्र कावड यात्रा आज फलटण शहरात दाखल झाली. येथील जिंती नाका परिसरात या कावड यात्रेचे फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते श्री शिव कावडीचे यथोचित पूजन करण्यात आले व महाआरती करण्यात आली. “फलटण तालुक्यावर आणि येथील संपूर्ण जनतेवर शिवशंभू महादेवाची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो,” अशी प्रार्थना आमदार सचिन पाटील यांनी यावेळी कावडीचे आणि महादेवाचे दर्शन घेताना केली.

या स्वागत समारंभाप्रसंगी कावड प्रमुख श्री. कावड महाराज, युवा नेते सुनील घोलप, बाळासाहेब, रणजित काशिद यांच्यासह परिसरातील नागरिक व यात्रेतील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘हर हर महादेव’च्या आणि ‘शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात यात्रेने शिंगणापूरच्या दिशेने पुढील मार्गक्रमण केले.


Back to top button
Don`t copy text!